राष्ट्रीय शेतकरी दिवस
राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या तमाम शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा !!!!
शेतीप्रधान देशात शेती व शेतकरी हे दोन्ही देशाचा कणा आहेत आणि त्या कण्याला सरळपणे चांगल्यापद्धतीने ठेवण्यासाठी एका मजबूत आधाराची गरज आहे. पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या महत्त्वाच्या काही गोष्टीं मध्ये जर शेतकऱ्याला सातत्याने सर्व स्तरांमधून सहकार्य भेटले तर नक्कीच देशाला समृद्ध बनविण्यास सगळ्यात मोठा वाटा हा शेतकऱ्याचा असेल आणि ते शक्य आहे. अश्या वेळी शेतकऱ्याला कोणत्याही पॅकेज व कुबडीची गरज पडणार नाही आणि तो खऱ्या पद्धतीने आत्मनिर्भर बनेल.
- देशाचा व जागतिक मार्केटच्या मागणी पुरवठ्याचा विचार करून पिकाचे नियोजन व्हावे व त्या पद्धतीने शेती व्हावी
- जागतिक मार्केट मध्ये बाजारपेठ उपलब्द करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत व त्या नुसार शेती व्हावी
- शेतमालाला होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत व मालाचा दर्जा बघून रास्त दर मिळावा
- रासायनिक शेती निविष्ठांचा वापर कमी करून संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंद्रिय शेती निविष्ठा चा वापर करून एकात्मिक पद्धतीने शेतीचे नियोजन करावे
- जमिनीच्या सुपीकतेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि शक्य होईल तर सेंद्रिय पद्धतीने कर्रब वाढविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे
धन्यवाद !!!